कोणी दिला सोमय्याचा बळी दिला ?

कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

10
किरीट सोमय्या
किरीट सोमय्या

भाजप (bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अवघ्या राज्यात खळबळ माजली आहे. पण शिवसेनेच्या (shivsena ) ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Darke) यांनी भाजपवरच सोमय्या यांचा बळी दिल्याचा आरोप केला आहे. विधिमंडळ (Legislature) अधिवेशनाला वेगळे वळण देण्यासाठी भाजपने किरीट सोमय्या यांचा बळी दिला, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या सुषमा अधारे?

भाजपने मोठ्या मोठी प्रकरणे लिलया जिरवून टाकली. पण सोमय्यांचा व्हिडिओ आत्ताच का यावा? महाराष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेल्या भाजपने आमदार खरेदी-विक्री, पक्ष फोडाफोडी, या सर्व पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळे वळण देण्यासाठी किरीट सोमय्या यांचा बळी दिला आहे, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एकप्रकारे त्यांनी या प्रकरणी भाजपलाच जबाबदार मानले आहे.

विधिमंडळातही तीव्र पडसाद

दुसरीकडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, प्रस्तुत प्रकरणात गुन्हा करणारी व्यक्ती कोण आहे, कोणत्या पक्षात आहे, हा विषय महत्त्वाचा नाही. ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे.

दानवे पुढे म्हणाले की, माझ्याकडे काही व्हिडिओ आलेत. काही माता-भगिनींनी अतिशय हिंमत करून हे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचवलेत. त्या भगिनींना मी सलाम करतो. कारण हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला केंद्राची सुरक्षा आहे. ते या सुरक्षेचा वापर महिलांकडून खंडणी करण्यासाठी करत आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपच्या संबंधित नेत्याने काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला. माझ्याकडे 8 तासांचे व्हिडिओ आहेत. मी ते सभापतींना देणार आहे. हे कृत्य करणारी व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. विशेषत: मराठी भगिनींना ब्लॅकमेलिंग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे राजकीय दलाल, उपरे या महाराष्ट्रात आलेत. मराठी माता भगिनींचा छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या व्यक्तीचे नाव मी स्पष्टपणे घेतो. त्याचे नाव किरीट सोमय्या आहे. त्याने काय-काय केलंय, हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे. अशा किरीट सोमय्याला सत्ताधारी पक्ष संरक्षण देणार का? ज्या माता-भगिनींनी टाहो फोडला आहे? त्यावर हे राज्य सरकार काय करणार? किरीट सोमय्यांच्या त्रासामुळे अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला आहे. अनेकांना तुरुंगात जावे लागले आहे, असेही दानवे यावेळी सोमय्यांवर टीकेची झोड उचलत म्हणाले.

Google search engine