फडणवीसांच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल

50

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या साधेपणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा व्हायरल झालेला फोटो आणि अधिवेशनाला (convention) जाताना त्यांनी केलेले कृत्य. आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरू झाले आहे. शोक प्रस्ताव मांडल्यानंतर विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विधान परिषदेत अधिवेशन सुरू होताच शेकापचे जयंत पाटील यांनी नीलम गोर्‍हे यांच्या पदावर आक्षेप घेतला. त्यांनी सभागृहाबाहेरही सरकारवर टीका केली आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांची कृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत असताना पाऊस पडत होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बूट काढून हातात घेतले आणि अनवाणी पायांनी विधानसभेत पोहोचले. शूज पाण्यात भिजू नयेत आणि शूजची घाण हॉलमध्ये जाऊ नये, यासाठी त्यांनी ही काळजी घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीचे चांगलेच कौतुक होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘इन्सपायरिंग’ असा शब्द लिहिला आहे. त्यानंतर त्याने हा फोटो ट्विट केला आहे.

‘संघ संस्कारांचा स्वयंसेवक नेता’ असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनीही फोटो ट्वीट केला. भाजपाच्या नेत्यांसह अनेकांना देवेंद्र फडणवीस यांचा हा साधेपणा भावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही बाब शिकण्यासारखी आहे, असे म्हणत काही नेटकऱ्यांनीही हा फोटो ट्वीट केला आहे. त्यांच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होताना दिसते आहे.

 

Google search engine