…अन्यथा, १४० प्रवाशांचा गेला असता जीव

मोबाईल गरम झाला तर प्रवाशाने पायलटला सांगितले

40
एअर इंडिया
एअर इंडिया

उदयपूर : एअर इंडियाच्या (Air India)  एका विमानात रविवारी एक अपघात थोडक्यात टळला. उदयपूरहून (Udaipur) दिल्लीला (Delhi) जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाचा मोबाईल (mobil) प्रचंड गरम झाला. प्रवाशाने पायलटला याची माहिती दिली. विमान टेकऑफ होणारच होते, पण घाई घाईल उड्डाण रद्द करण्यात आले.

विमानात सुमारे 140 प्रवासी होते. दरम्यान, त्याचवेळी एका प्रवाशाची तब्येतही बिघडली होती. त्यामुळे त्याला उदयपूरमध्येच उतरवण्यात आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दाबोक येथील महाराणा प्रताप विमानतळावरून फ्लाइट 470 ने नवी दिल्लीसाठी उड्डाण घेणार होते. पण प्रवाशाने पायलटला मोबाईल गरम झाल्याची माहिती दिली तर विमानातील सर्व प्रवासी घाबरले.

त्यानंतर उड्डाण थांबवून तांत्रिक तपासणी करण्यात आली. तपास पूर्ण झाल्यानंतर विमानाने पुन्हा दिल्लीकडे उड्डाण केले. दाबोक विमानतळाचे संचालक योगेश नागाईच यांनी सांगितले की, अखेरच्या क्षणी उड्डाण रद्द करण्यात आले होते.

Google search engine