का झाले दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित ?

विरोधकांचा सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल

8
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलेच अधिवेशन  आजपासून सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (congres)  सर्व मंत्र्यांनी कामाला सुरूवात केली असून या अधिवेशनात त्यांच्यावर विरोधक हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फूटीनंतर महाविकास आघाडीची बाजू कमकुवत झाली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा वचरष्मा राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसात दिवंगत नेत्यांना विधान परिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

विधान परिषेच्या 3 आमदारांविरोधात सचिवांना पत्र देत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने त्यावर चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

निलम गोऱ्हेंविरोधात प्रस्ताव मांडायचा असेल तर, त्याची प्रक्रिया असते. कायद्यातील तरतुदीनुसार असा प्रस्ताव मांडता येईल. मात्र, त्यासाठी सभागृहाला वेठीस धरता येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रस्तावाल त्यांनी विरोध केला.

शेकापने नेते आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. कामकाजाच्या आधी या प्रस्तावावर विचार करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा परिचय करुन दिला.
​’वंदे मातरम्’ ने विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेमध्ये अधिवेशन सुरू झाले.

Google search engine