यूपीएससी उत्तीर्ण भिवापूरच्या प्रथमेश तिजारेचा सत्कार

लक्ष्मण बहुउद्देशीय संस्था, भिवापूर महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम

11
प्रथमेश तिजारेचा सत्कार
प्रथमेश तिजारेचा सत्कार

भिवापूर (प्रतिनिधी ) : राजेश जांभुळे

भिवापूर महाविद्यालयात लक्ष्मण बहुउद्देशीय संस्था, भिवापूर महाविद्यालय यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 85 वे तर राज्यात 6 वे स्थान प्राप्त केलेल्या भारतीय वनसेवेचे शिखर गाठलेल्या प्रथमेश तिजारे या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधिर पारवे, उद्घाटक डॉ. जोबी जॉर्ज, सत्कारमूर्ती प्रथमश तिजारे, मातोश्री शोभाताई तिजारे, प्राचार्य ज्योती लांबट, प्राचार्य किर्ती नायर, प्राचार्य वैभव समर्थ, कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, अमित तुमडाम चरणजितसिंग अरोरा, विवेक ठाकरे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रथमेश तिजारे, त्याच्या मातोश्री, शोभाताई तिजारे, भाऊ कृणाल तिजारे यांचा मान्यवरांच्या हस्ते थाटात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथमेश तिजारे यांनी विद्यार्थ्यांना यश प्राप्त करायचे असेल तर लक्ष निश्चित करून नियमित अभ्यासाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. जोबी जॉर्ज यांनी संपूर्ण शैक्षणिक संस्थातील विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. आमदार सुधिर पारवे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या विकासासाठी प्रतिबध्द असल्याचे सांगितले. या तालुक्यातील शैक्षणिक संस्थामध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटीबध्द आहोत असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील शिंदे यांनी केले. संचालन शरद मिरे यांनी तर आभार डॉ. अश्विनी कडू यांनी मानले. भिवापूर येथील सर्व संस्थाचे शिक्षक व विद्यार्थी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नी सांगितले.

Google search engine