कोपरगाव प्रतिनिधी (अजय विघे) :
येथे जिजाऊ (jijau) उद्यान गोदावरीजवळ शनिवारी निरंकार सेवा पिठ, मसाला, गिरणी कामगार महासंघ महाराष्ट्र संस्थापक प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी संघटित पीठ, मसाला, भात गिरणींना शेती पूरक गृह उद्योगात घेऊन अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे. औषधोपचाराची व्यवस्था शासनामार्फत मोफत व्हावी. यांच्या मुलांना कॉलेज पर्यंत चे शिक्षण मोफत मिळावे. वय वर्ष ५० नंतर मानधन योजना राबवावी. अत्यावश्यक सेवा म्हणून लाईट बिलात सवलत मिळावी. संघटित पीठ, मसाला, भात गिरणी कामगारांसाठी आर्थिक महामंडळाची नियुक्ती करावी. संघटित पीठ, मसाला, भात गिरणी वीज ग्राहकाच्या कामगाराच्या कुटुंबास विमा संरक्षण मिळावे. वापरलेल्या युनिट दरापेक्षा कोणतेही ज्यादा आकार लावू नये. भरलेल्या डीपॉझीट रकमेवर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज मिळावे व वर्षातून एखाद्या महिन्यात विलात नमूद करावे आदि विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. पदाधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी अडचणी सरांपुढं मांडल्या. यावेळी डॉ. वसंत गुजराती, नसरत सय्यद, अजय विघे ( पत्रकार), सुरेश रासकर, नसरत सय्यद, संदीप थोरात, आनंद चव्हाण, सागर भास्कर, चैतन्य मोरे, राहुल नाईक, योगेश निकम, अरुण गोरे, सोमनाथ दळवी, मच्छिंद्र सोनवणे, गणेश शेळके, एजद सय्यद, जकिया सय्यद, जावेद शेख, दया आव्हाड, सोनाली भास्कर, माया थोरात, सिंधू वारे आदि उपस्थित होते.