आषाढी एकादशीनिमित्त पायदळ वारीचे आयोजन

सेवाश्रमात अनेक धार्मिक कार्यक्रम उत्साहात

12
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी

बेला : जवळच्या बरबडी येथील राष्ट्रीय महामार्गावरील आदिनाथ गुरुमाऊली सेवाश्रमाच्यावतीने आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शुभपर्वावर भक्तांची हिंगणघाट (Hinganghat) ते बरबडी अशी पायदळ वारी आज हिंगणघाट येथून अनिल सातपुते यांच्या घरून सकाळी निघणार आहे. वारीचा समारोप 29 जून गुरुवारला बरबडी येथील सेवाश्रमात होणार आहे. असे संयोजक ओमप्रकाश पांडे व राजूजी मेघरे यांनी एका पत्रकाअन्वये कळविले आहे.

पायदळ वारीत सेवाश्रमाचे संस्थापक ब्रह्ममूर्ती सद्गुरु शेषानंद महाराज प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आषाढी एकादस व वारीच्या निमित्ताने बरबडी येथील सेवाश्रमात अनेक धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात येतात. त्या प्रथेनुसार यंदाही पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले आहे. पायदळ वारीत हिंगणघाट, बुटीबोरी, वारंगा, डोंगरगाव, चिंधीचक येथील आदिनाथ गुरुमाऊली भजन मंडळ, दिंड्या व अनेक भक्त, शिष्यांचा सहभाग असणार आहे. वाटेत शेडगाव चौरस्त्यावरील स्वामी समर्थ मठात वारीचा मुक्काम असेल. त्यावेळी सेवाश्रमाचे सचिव ह.भ.प. ओम प्रकाश पांडे भक्तांना मार्गदर्शन करतील. 29 जूनला सेवाश्रमात डॉ. श्याम माहुलकर व पुजाराम खिरटकर यांच्या हस्ते गंगाजल अभिषेक होईल. असे रामप्यारी चंदेल (बुट्टीबोरी ) यांनी सांगितले.

Google search engine