आदिपुरुषची कथा सपाट तर VFX कमकुवत

पार्श्वसंगीत मात्र अंगावर काटा आणणारे

68
आदिपुरुष
आदिपुरुष

सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं… हे सिद्ध करण्यासाठी आदिपुरुष (Adipurusha) हा चित्रपट आला आहे. रामायणावर (Ramayana) आधारित या चित्रपटात (film) प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान (Saif Ali Khan) हे मुख्य भूमिकेत आहेत. 650 कोटींमध्ये बनवलेला आदिपुरुष भारतातील सर्वात महागडा चित्रपट आहे.

कशी आहे कथा ?

वनवासात असताना सीता हरणानंतर रावणाचा नाश करण्यासाठी लंकेला पोहोचलेल्या भगवान श्री रामांची कथा दाखवली आहे. रामायण माहिती असलेल्या प्रत्येकाला ही कथा माहिती आहे. चित्रपट सीता हरणपासून सुरू करून रावणाच्या वधाने संपला आहे. आदिपुरुषाची कथा अगदी फ्लॅट आणि अगदी अंदाज लावता येणारी अशी आहे. त्यात सर्जनशीलतेचाही अभाव स्पष्टपणे दिसून येतो.

प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत असलेल्या प्रभासचा अभिनय दमदार असला तरी अनेक ठिकाणी तो पूर्णपणे बाहुबलीच्या रुपात दिसतो. रामसेतू बनवण्याआधी प्रभासने वानर सेनेचे मनोबल वाढवलेले पाहून तुम्हालाही बाहुबली चित्रपटातील कालकेयाच्या लढाईचे दृश्य नक्कीच आठवेल.

जानकीच्या भूमिकेत क्रितीचा ग्रेस काहीसा कमी जाणवतो. रावणाला इशारा देण्याच्या सीनमध्येही दम दिसत नाही. रावणाच्या भूमिकेतील सैफचे दमदार संवाद अगदी कृत्रिम वाटतात. बजरंग बली बनलेला देवदत्त नागे चित्रपटातील सर्वात मजेदार भाग आहे. त्याचे पात्र सामर्थ्य आणि हशा घेऊन येते.

चित्रपटाचे पार्श्वसंगीत

आदिपुरुष चित्रपटाच्या सशक्त मुद्द्याबद्दल बोलायचे झाले तर ते आहे पार्श्वसंगीत. संगीत चित्रपटाचा प्राण आहे. थिएटरमध्ये जय श्री राम गीत ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

चित्रपटाचे VFX

चित्रपटाच्या VFX मध्ये काहीही विशेष सुधारणा झालेली नाही. तुम्हाला रावणाच्या एंट्रीचा सीन, हरणाचा सीन आणि रामसेतू बनवण्याचा सीन नक्कीच आवडेल. चित्रपटातील बहुतांश दृश्ये अतिशय गडद आहेत.

Google search engine