प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले

काही कुत्र्याला घातले; मुंबईत लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या

18

मुंबई : मुंबईतील (mumbai)  एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची (Live in partner) हत्या करून तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. कहर म्हणजे या व्यक्तीने तिचे केवळ तुकडेच केले नाही, तर हे तुकडे कुकरमध्ये (cooker) शिजवून काही कुत्र्याला खाऊ घातल्याची संतापजनक बाबही समोर आली आहे. या घटनेमुळे दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे. श्रद्धा हत्याकांडात आफताबने आपल्या प्रेयसीचे 30 हून अधिक तुकडे करून जंगलात फेकले होते.

मीरा रोड भागातील घटना

यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबईतील मीरा रोड भागातील गीता-आकाशदीप सोसायटीत ही घटना घडली आहे. सोसायटीच्या 7 व्या मजल्यावर 56 वर्षीय मनोज साहनी आपली 36 वर्षीय लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य यांच्यासोबत प्रदिर्घ काळापासून राहत होता. काही दिवसांपासून मनोजच्या फ्लॅटमधून विचित्र दुर्गंधी येत होती. या दुर्गंधीने त्याचे शेजारी पुरते हैरान झाले होते. त्यांनी कंटाळून या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

फ्लॅटमध्ये दुर्गंधी, तुकड्यांत सरस्वतीचा मृतदेह

माहिती मिळताच नया नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी मनोजच्या फ्लॅटवर पोहोचले. त्यांनी मनोजचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडल्यानंतर ते आत पोहोचले असता त्यांना व इतर व्यक्तींना आत उग्र वास आला. त्यांनी पोलिसांनी घराची झडती घेतली असा त्यांना महिलेच्या मृतदेहाचे तुकडे दिसून आले. हे पाहून पोलिसही अचंबित झाले. त्यांनी मनोजला तत्काळ अटक केली. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने हा मृतदेह आपली लिव्ह इन पार्टनर सरस्वतीचा असल्याचे कबूल केले.

विद्युत करवतीने केले शरीराचे तुकडे, कुकरमध्ये शिजवले

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोज व सरस्वतीचे कोणत्या तरी मुद्यावरून भांडण झाले होते. त्यानंतर रागाच्या भरात मनोजने सरस्वतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने बाजारात जाऊन चेन सॉ अर्थात विद्युत करवतीने तुकडे केले. त्यानंतर ते कुकरमध्ये शिजवले. एवढेच नाही तर काही तुकडे गॅसवर भाजून नंतर ते बादली व टबमध्ये ठेवल्याचेही आढळले. पोलिसांच्या मते, आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी व दुर्गंधी दूर करण्यासाठी हे कृत्य केले असावे.

3-4 दिवसांपूर्वी हत्या

पोलिसांच्या मते, हे हत्याकांड 3-4 दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता आहे. सध्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. फ्लॅटमधून इतर पुरावेही गोळा करण्यात आलेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फ्लॅट सील केला आहे

10 वर्षांपासून हाेते प्रेमसंबंध

मनोज सहानी व सरस्वतीचे गत 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. पण गत काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते.

मनोज बोरिवलीत दुकान चालवतो

डीसीपी जयंत बाजबाले यांच्या माहितीनुसार, शहरात लिव्ह इन पार्टनरच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे या घटनेचा खुलासा झाला. त्यात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडलेत. आरोपीला अटक करण्यात आली. त्याची चौकशी सुरू आहे. आरोपी मनोज हा बोरिवली परिसरात दुकान चालवतो. हे दुकान कोणाचे आहे, याचा शोध घेतला जात आहे. त्याची सखोल माहिती काढली जात आहे.

Google search engine