- नागपूर :- सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मुर्तीदिन. छत्रपती शाहू महाराज एक असे राज्यकर्ते होते ज्यांनी दलितांना आरक्षण देण्यासाठी आणि समाजात त्यांना हक्क मिळावे म्हणून आयुष्यभर संघर्ष केला.
राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव संजय दुबे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून आभिवादन केले. प्रसंगी नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बंडोपंत टेम्भूर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजाला नवी दिशा देण्यासाठी शाहू महाराजांनी सातत्याने प्रयत्न केले. सहकार, कृषी, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी उत्तुंग कामगिरी केली असे यावेळी बोलतांना दुबे म्हणालेत.
प्रसंगी हरिभाऊ किरपाने, सुरेश पाटील, दीपक खोब्रागडे, मुलचंद मेहर, असद खान, सुरेश जग्यासी, विनोद राऊत, गीता श्रीवास, अनिसा बेगम, रेखा लांजेवार, चेतन तरारे, लालाजी जैस्वाल उपस्थित होते.