मुंबई : मधुमेहाचा आजार अतिशय वेगाने पसरत आहे. अशावेळी मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा त्यांची रक्तातील साखरेची पातळी (sugar level) कधीकधी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. अशावेळी रुग्णांनी फळांचा आहारात समावेश करावा, पण साखरेचे रुग्ण प्रत्येक फळ खाऊ शकत नाहीत. मग अशा कोणत्या फळांचा समावेश शुगर पेशंटने आपल्या आहारात करावा? तर यासाठी हि बातमी सविस्तर वाचा…
१. किवीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म तसेच व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषक असतात. मधुमेहाच्या रुग्णांनी किवीचा रस आणि सलाड अवश्य खावे, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील.
२. उन्हाळ्यात जांभूळ खाणे फायदेशीर ठरू शकते. या फळाची टेस्ट आपल्या सर्वांना आकर्षित करते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे महत्वाचे आहे कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्याच्या बियांची पावडर बनवून खाल्ल्यानेही फायदा होईल.
३. संत्री व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्त्रोत आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांचे आरोग्य राखण्यास मदत होते.
४. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू अधिक चांगला मानला जातो कारण या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चे गुणधर्म आढळतात. याशिवाय फायबरच्या गुणधर्मांचा फायदा घेता येतो. किवीमध्ये ग्लुकोज इंडेक्स कमी असल्याने साखर नियंत्रणात राहते.