जंगली रमीने केला घात, ५५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

कर्जबाजारी पणाला कंटाळून घेतला गळफास

16
जंगली रमीने केला घात
जंगली रमीने केला घात

मुंबई : कर्जबाजारी पणाला कंटाळून एका 55 वर्षीय व्यक्तीने पंख्याला लटकून आत्महत्या (suicide) केल्याची घटना मुंबई पनवेल येथे घडली. मृतक व्यक्तीने आपण कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले होते. कर्जाने काढलेले पैसे आपण जंगली रमीमध्ये (Wild Rummy)  हरल्याचे सांगून, आपण पैसे कमावण्याचा शॉर्ट कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे होऊ शकले नाही. पैसे कमावण्याच्या नादात जंगली रमीने मी पूर्ण उद्धवस्थ झालो. त्यामुळे माझ्यावर झालेले कर्ज मी फेडू शकत नसल्याचा नैराशेतून आपण आत्महत्या केली असून, आपल्या मरणाला आपणच जबाबदार असल्याचे त्यांनी या सुसाईट नोटमध्ये लिहून ठेवले आहे.

मुलाने घरात प्रवेश करताच त्याला पंख्याला गळफास घेऊन लटकलेले वडील दिसले. घाई-घाईत खाली उतरवून उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र उपचाराआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची चौकशी केल्यांनतर धक्कादायक कारण समोर आले. जंगली रमीबाबत या घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पवार करीत आहेत.

Google search engine